Tuesday 12 January 2016

ती नाजुकशी भेट

बिथरल्या नजरांची, चोरटी पाऊलवाट,
भेटावयास ती आली, मनी करुनी निर्धार ।।१।।

झाली कशी बरी आज भेटण्यास हि तयार,
मनी त्याच प्रश्नांचा, माझ्या गुंजलेला नाद ।।२।।

ओठ सांगता सांगता बोलले ते हळुवार,
किमया हि मैत्रिणींची, त्यांच्या हट्टालाच दाद ।।३।।

प्रश्न कित्येक मनाशी बंधीयाले होते तिच्या,
जरुरी होते ते सारे, उभ्या आयुष्याची भ्रांत  ।।४।।

चळवळ त्या बोटांची, अडखळलेले पाय,
काही कळेनासे झाले, द्यावा काय प्रतिसाद ।।५।।

क्षण मोलाचे संपले निघाली ती जेव्हा घरा,
ठोका हृदयाचा बसे  पाय तिने वळविता,
थांबून मग जरा, हास्य उमलले तिला,
श्वास सोडुनिया तेव्हा स्वर्ग गाठला मी आज … स्वर्ग गाठला मी आज ।।६।।

Friday 16 January 2015

रात्र काळी होतच राही

गोंधळल्या वाटेवर, भिडे मतांचा संवाद
रात्र काळी होत राही, नशिबाचा एक नाद ।।

संतप्त प्रियजन सारे, अतृप्त मनाची गाठ
ओठ परी दाताखालून, कधी चुकत नसे वाट ।।

ओलांडूनी चौकट ही, आत आला खरा गडी
निघता निघता रात्र, उजेडात बदलली ।।

भ्रांत न उभ्या जगाची, वेळ मजवर ऐसी आली
वाट पाहून माय माझी, अखेरीस निजून गेली ।।

शेवटी वदले मन, "आणि करा यांचा लाड"
रात्र काळी होतच राही, नशिबाचा एकच नाद ।।

Sunday 20 May 2012

तोच गाव


धाव टाके त्या दिशेने व्याकूळ नजरेची वाट,
तृप्त हे झाले मन पाहुनी त्यांची हि तहान,
भेटलो जरी किती वर्षाची घेउनीया झेप,
रुसल्या नात्यांचा अखेरीस लागतो तपास..

मायेची रेशीमगाठ कोणी का लपवू शकेना,
हा तोच गाव मी आज हि, पाहिला पुन्हा || १ ||

चौकट दाराची ओलांडून आलो जेव्हा अंगणात,
स्पर्शुनी त्या धरणीला गार पडे काळजात,
रोउनी अंगठा मातीमध्ये शोधिल्या खुणा,
कुणा का ठाऊक सोडला समाधानी श्वास,

हळूच मग चौफेर नजर हि दौडली पुन्हा,
हा तोच गाव मी आज हि, पाहिला पुन्हा || २ ||

गावाची बात छोटी, दिवसाची घेर मोठी,
अशा या छोट्या गावात, जत्रेची शान मोठी,
आठवली कधी काळी लपलेली मजा याची फार,
आणि ती ओरड, सोडला होता चुकून जेव्हा हात,

असो त्या जत्रेचा सहवास कितीही जुना,
हा तोच गाव मी आज हि, पाहिला पुन्हा || ३ ||

विसरलो चिंता स्वतःच्या, सोडल्या कामाच्या व्यथा,
केंद्रित झाल्या होत्या, त्याच उबदार छटा,
गुंग भावनांना मुळी परतीचे भानच राहेना,
एकच वाट तरी त्याचा कधी कंटाळाच येईना,

काळी माती तयाची पायधुळी चाखिली पुन्हा
हा तोच गाव मी आज हि, पाहिला पुन्हा || ४ ||

Friday 3 February 2012

अधुरी दास्तान

अनकही इस हथेली पर, कुछ गुमशुदा लकीरे थी |
धुंदली होकर खोई हुई, इनमे कुछ तकदीरे थी ||

हमसफ़र रास्तो में थम गया है कही पर |
घूंट मायुसियोके गम में, पी रहा है डुबोकर |
वक्त का है येही तकाजा,
क्यों तू आंस लगा बैठा है ||

अनकही इस हथेली पर, कुछ गुमशुदा लकीरे थी |

बेजुबां एक किनारा, भूले भटको का था सहारा |
यादे उनकी समेटे रखता था वोह बेबस बेचारा |
उन सभी कदमोकी दास्ताँ,
करना चाहे बयां ||

अनकही इस हथेली पर, कुछ गुमशुदा लकीरे थी |
धुंदली होकर खोई हुई, इनमे कुछ तकदीरे थी ||

नवचैतन्य

अंथरल्या स्वप्नांचे, सु-मधुर हे जाळे,
गुंग जीवनामधले, मोहक मृगजळ चाळे | |

कधी अल्पायुष्याची जाणीव मजला कळते,
कधी तर संसाराची, भ्रांत केवढी पडते | |

पाहुनी मग तान्हेल्या, धडपड त्या बाळाची,
जागते पुन्हा एकदा, जिद्द आज लढण्याची | |

"शब्दांचे डोंगर मांडून, उगाच कर्तव्ये सरसावताना,
कित्येकदा वयस्कर मंडळी दिसतात, इतरांना समजावताना,
म्हणे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात
आणि स्वताच्या चुकांवर मात्र पांघरून घालतात"

नवयुग हे तरुणांचे, आधुनिक कौशल्याचे,
सराहुनी सोपवूनी द्या, भार उभ्या आयुष्याचे | |

Monday 7 November 2011

क्रिकेट फीवर

फिर धीमी धीमी चाल, फिर सास फूली आवाज़,
आओ देखो खिलकारिसे मस्त हुई ये शाम
कभी जोरसे गारेला, कभी किसे पुकारेला,
ये किरकेटका फीवर है धूम मचारेला | | १ | |

बोलरके बढ़ते गेंदोमे वक्त जो थमजावे,
और पलमे बल्लेकी टकसी आवाज़ जो मिलजावे,
मन प्रसन्नता से उडके फिर जो ताली मारेला,
ये किरकेटका फीवर है धूम मचारेला | | २ | |

जब अपना वीरू और सचिन नजदीक शतकके आवे,
और मुह्तले दातोमे उंगली रास्ता भटकजावे,
हर कोई चाहे काश ये रन तो मै ही बनालेता,
ये किरकेटका फीवर है धूम मचारेला | | ३ | |

सब भूल-भालके बैठे रहगये काम भला ना धंदा,
अब छोडो आनाकानी, करेगा आज बॉस क्या भला?
एक घडीकी टिकटिक सब माहोल बदलरेला,
ये किरकेटका फीवर है धूम मचारेला | | ४ | |